Bailgada Sharyat : देगाव येथे रंगला बैलगाडा शर्यतींचा थरार! पाहा कोण ठरलं शर्यतीचा सम्राट
Bailgada Sharyat : दहा एकर मोकळ्या जागेत अडीचशे बैलगाडा मालकांचा सहभाग; समालोचकांच्या आवाजावर मैदानात रंगली चुरस.

Bailgada Sharyat – देगाव, ता. वाई येथील भैरवनाथ यात्रा व शिवजयंती उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतींचा थरार प्रेक्षकांनी अनुभवला. डोंगरावरील दहा एकर मोकळ्या जागेमध्ये झालेल्या या शर्यतींमध्ये विसापूर येथील नीलेश कदम यांचा ‘कार्तिक’ व कशेळे येथील प्रभाकर दिसले, पिसुर्डी येथील सदाभाऊ बरकडे यांचा ‘किस्मत’ यांनी प्रथम क्रमांक पटकवला.
अभेपुरी येथील स्वरूप मांढरे यांचा ‘शिंगर्या’ व सोनगाव येथील मानवी नावडकर यांचा ‘तेजा’ यांनी द्वितीय, विंग येथील आयुष तळेकर, जाधववाडी येथील जाधव यांचा ‘सेवा’ आणि हिंगोली येथील अक्षय बेंगाळ यांचा मधूर यांनी तृतीय, माळेवाडीतील प्रज्वल कापसे यांचा ‘संकेत’, कोंडवे येथील लक्ष्मण गाडे यांचा ‘रायफल 7474’, खर्शी येथील अमित शिवणकर, सुजीत शिवणकर आणि कुडाळच्या संदीप तोडकर यांचा ‘रणवीर’ यांनी चतुर्थ,
वाईतील पै. ओंकार घाटे व विशाल काळे यांचा ‘थैमान’, बापू सुतार आणि सागर भांडलकर यांचा ‘शंकर’ यांनी पाचवा, राऊतवाडी येथील आयुष्य ड्रायव्हर व वृंदा साळुंखे यांचा ‘मेहबूब’ आणि नांदवळ येथील गुंडा पवार यांचा ‘सुंदर’ यांनी सहावा आणि शेंदुरजणे येथील अजित पैलवान यांचा ‘पक्षा’ व नांदवळ येथील सुमित भोसले यांचा ‘रुद्रा’ यांनी सातवा क्रमांक मिळवला. या शर्यतींमध्ये 250 बैलगाडामालकांचा सहभाग होता. विकास जगदाळे व प्रताप झांजुर्णे यांनी समालोचन केले.
देगाव येथील भैरवनाथ बैलगाडा संघटनेचे नीलेश पाटील, यात्रा कमिटी अध्यक्ष राहुल इथापे, उद्योजक गणेश इथापे, सरपंच सूरज पिसाळ, प्रशांत इथापे, प्रसाद सपकाळ, प्रमोद शिंदे, अनिकेत सावंत, निखिल इथापे, उत्तम इथापे , प्रवीण इथापे, सयाजी थोपटे, संजय इथापे, नवनाथ इथापे, ओंकार इथापे, पै. विजय इथापे, दिलीप इथापे, राहुल सूर्यवंशी, पै. संजय इथापे, सतीश इथापे, अक्षय इथापे, महेश जाधव यांनी शर्यतींचे नियोजन केले. भुईंज पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.





