जामखेडमध्ये शिवजयंतीचा उत्साह! शिवरायांचा आदर्श ठेवून आरंभ फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद : आकाश बाफना
Jamkhed News : जामखेडमध्ये आरंभ फाउंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

Jamkhed News : “छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेत सार्वभौम लोकशाही व्यवस्थेचा पाया रचला. स्वत्व आणि स्वाभिमान यांची पेरणी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये एतद्देशीय रयतेचे राज्य निर्माण केले.
जनतेला अन्याय, अत्याचार, अनाचार यापासून मुक्त करत लोककल्याणकारी राज्याची स्थापना केली. शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आरंभ फाउंडेशन जामखेड शहरात कार्य करत असल्याचे गौरौद्गार शिवसेनेचे नेते आकाश बाफना यांनी काढले.
शहरातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या कोर्ट रोड वरील आरंभ फाउंडेशनच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी आकाश बाफना यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी आरंभ फाउंडेशनचे संस्थपाक अध्यक्ष व पत्रकार ओंकार दळवी, चेतन राळेभात, पांडुरंग माने, अशोक हुलगुंडे, संजय फुटाणे, विशाल लोळगे, पत्रकार डॉ प्रकाश खंडागळे, समीर शेख, ऋषिकेश ठाकरे, विकास वाघमारे, रमजान मदारी, विक्रम जमदाडे, शिवकुमार डोंगरे, अरुण लटके, अमोल चौरे, श्रीधर सिध्देश्वर, नितीन राऊत, उमेश औचारे, विजयकुमार जाधव, हितेश वीर, गफ्फार पठाण, मयूर टेकाळे, मनोज शेळके, भुजंग दळवी, अमर चाऊस, रवी बोधले आदींसह आरंभ फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी शिवकालीन पोवाडे भक्तीमय वातावरणात शिवरायांना अभिवादन करण्यात आले. आरंभ फाउंडेशनच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवली जातात.





