वाघोली : शिरसवडी तालुका हवेली येथील अजित विविध कार्यकारी सोसायटी च्या चेअरमन पदी सतीश नागवडे यांची तर व्हाईस चेअरमन पदी आप्पासाहेब चितळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माणिकराव गोते पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी उपसरपंच अंकुशराव गोते, लालासाहेब शिंदे, दौलतराव चितळकर, चंद्रकांत कदम, सोपानराव कदम, माजी उपसरपंच रमेश कदम,माजी उपसरपंच किरण शिंदे,
किशोर शिंदे, विजय शिंदे, सुरेश चितळकर, महादेव चितळकर,माजी उपसरपंच सुधीर गोते,रमेश गोते, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे हवेली तालुका माजी सदस्य प्रमोद गावडे, गावडेवाडी सोसायटीचे चेअरमन माणिकराव गावडे, मानसिंग गावडे संजय नागवडे, प्रमोद गोते, पांडुरंग नागवडे आदी मान्यवर उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून दीपक वराळ यांनी कामकाज पाहिले.