मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे ३० डिसेंबर रोजी दुःखद निधन झाले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी अहमदाबाद येथे येऊन आईचा अंत्यविधी केला. विशेष म्हणजे यानंतर पंतप्रधानांनी आपल्या दिवसभरातील पुढील कार्यक्रमांना देखील हजेरी लावली. पंतप्रधानांना झालेल्या मातृशोकानंतर सर्वच क्षेत्रातील दिग्गजानी श्रद्धांजली वाहिली. क्रिकेटर,उद्योग जगत, बॉलिवूडल मधील देखील सर्वांनी पंतप्रधानांच्या आईच्या निधनावर दुःख व्यक्त केले. अभिनेता शाहरुख खानने देखील पंतप्रधानांच्या आईच्या निधनावर दुःख व्यक्त केलं. यानंतर शाहरुखला नेटकऱ्यांनी अक्षरशः ट्रोल करायला सुरुवात केली.
पंतप्रधानांच्या आईचे निधन ३० डिसेंबर रोजी झाले. परंतु शाहरुखने ३१ डिसेंबर रोजी श्रद्धांजली अर्पण करत ट्विट केले. आपल्या ट्विटमध्ये तो म्हणतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेनजी यांच्या दुःखद निधनाबद्दल मनापासून शोक व्यक्त करतो,देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.. सर माझ्या कुटुंबाच्या प्रार्थना तुमच्या पाठीशी आहेत.” असं ट्विट शाहरुखनं केलं. परंतु या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली.
Heartfelt condolences to @narendramodi on the loss of his mother Heeraben ji. My family’s prayers are with you sir. May God bless her soul.
— Shah Rukh Khan (@iamsrk) December 31, 2022
तुला दोन दिवसांनी आठवण झाली देव तुला सद्बुद्धी देवो असं एका युजरने कमेंट करून म्हंटल आहे. तर दुसऱ्याने पंतप्रधान मोदी हे तुझे लंगोटीया यार आहेत का ? तू त्यांना असं बोलतोस असा सवाल विचारला आहे. तर एकाने तुला लाज वाटायला पाहिजे,ज्या देशात खातो पितो त्या देशात काय चाललंय हे माहिती नाही असं म्हणत शाहरुखला झापलं आहे. एकूणच नेटकऱ्यांनी शाहरुखच्या अशा वागण्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला आहे.