पुणे – करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ज्याप्रमाणे ऑक्सिमिटरची मागणी वाढली होती, त्याप्रमाणे तिसऱ्या लाटेमध्ये स्वत: चाचणी करायच्या किटची मागणीत वाढ होत असल्याचे दिसून येते. संसर्ग झाला आहे की नाही याची घरच्या घरी माहिती देणाऱ्या या किटची खरेदी करण्यासाठी गर्दी होत असल्याचे शहरातील औषध विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्सचे व्यवस्थअपकीय संचालक हसमुख रावल म्हणाले, “स्वस्यंचाचणी किट्स आम्ही देशात सर्व प्रथम निर्माण केल्या. ओमायक्रॉन देशात पसरायला लागल्यानंतर देशात या किट्सच मागणी वेगाने वाढली. त्यात येत्या काही दिवसांत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अनिल बेलकर म्हणाले, गेल्या काही दिवसात या किटची विक्री आणि त्याची चौकशी वाढली आहे.
स्वयंचाचणी किटचा निष्कर्ष आरटी-पीसीआर चाचणीएवढा अचूक नसतो. तरीही लॅबरोटरीमधील गर्दी टाळण्यासाठी त्याचा वापर करण्याकडे कल वाढला आहे. पुणे जिल्ह्यात शुक्रवारी एका दिवसात सुमारे 30 हजार किट विकले गेले. जयेस कासट म्हणाले, बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे सेल्फ किटची मागणी वाढलेली आहे. त्याचबरोबर एन95 , डिस्पोजेबल मास्क याचीही विक्री वाढली आहे.’