उपाध्यक्षपदी अॅड. रोहन जाधव
वडूज – येथील वकील संघटनेची सन 2024 -2025 ची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी अॅड. श्रीनिवास मुळे (पुसेगाव), उपाध्यक्ष पदी अॅड. रोहन जाधव(गुरसाळे) तर सचिवपदी अॅड. सज्जन कदम (म्हासूर्णे) यांची बहुमताने निवड झाली.
या वर्षीची निवडणूक ही तिरंगी स्वरूपाची होती. यात अध्यक्ष पदासाठी अॅड. श्रीनिवास मुळे, अॅड. मार्तंड काळे, अॅड. प्रल्हाद सावंत उपाध्यक्ष पदासाठी अॅड. रोहन जाधव, अॅड. संतोष कामाने तर सचिव पदासाठी अॅड. सज्जन कदम व अॅड. अनिकेत बोबडे यांचे अर्ज दाखल झाले होते.
या निवडणुकीत 155 सभासदांनी मतदानाचा अधिकार बजावला. यामध्ये अॅड. श्रीनिवास मुळे यांना 67 मते, अॅड. रोहन जाधव 113 मते तसेच अॅड. सज्जन कदम यांना 125 मते मिळवून विजय प्राप्त केला. सहसचिव पदी अॅड. काजल बेलवडेकर, सदस्यपदी अॅड. अनुराधा देशमुख (महिला प्रतिनिधी),अॅड. रमजान मुल्ला, अॅड. श्रेयस पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडणुकीस मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून अॅड. संतोष भोसले यांची तर निवडणूक अधिकारी म्हणून अॅड. कौस्तुभ ज्ञानसागर वअॅड. राहुल निकम यांनी काम पाहिले. मागील निवडणुकीप्रमाणे या निवडणूकीतही मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटींग झाल्याने दोन्ही गटाच्या पदाधिकार्यांना संधी मिळाल्याची चर्चा आहे.