मुंबई – अनेक बॉलिवूड स्टार्स चित्रपटांव्यतिरिक्त वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक करत असतात. कोणी कंस्ट्रक्शनमध्ये गुंतवणूक करतो तर कोणी एखाद्या फ्रॅन्चायसी चेनमध्ये पैसे गुंतवतो. अक्षय कुमारपासून सुनील शेट्टीपर्यंत तर गौरी खानपासून माधुरी दीक्षित पर्यंत प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या व्यवसायात गुंतवणूक केलेली आहे. अशात आता या यादीमध्ये अभिनेता संजू बाबाचा देखील नाव सामील झालं आहे. कारण संजय दत्तने देखील नुकतंच नव्या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्याचे समजते.
संजू बाबाने लवकरच लॉन्च होणार्या अल्कोहोलिक बेव्हरेजेस स्टार्टअप कार्टेल आणि ब्रॉसमध्ये गुंतवणूक केली आहे.मात्र, गुंतवणुकीची रक्कम अद्याप समोर आलेली नाही.स्टार्टअपच्या अधिकाऱ्यांनी या प्रोजेक्टमध्ये संजय दत्तने गुंतवणूक केली असल्याचे म्हंटले आहे.
‘कार्टेल अँड ब्रॉस’चे प्रमुख मोक्ष सानी आहेत, जे ‘लिव्हिंग लिक्विड्स’ मद्य रिटेल चेनचे भागीदार आहेत. आयात आणि किरकोळ चॅनेलद्वारे भारतीय बाजारपेठेत प्रीमियम लिकर ब्रँडची संपूर्ण श्रेणी सादर करण्याचा कंपनीचा मानस आहे. संजू बाबाने नेमकं कोणत्या पार्टसाठीपैसा गुंतवला याबाबत सविस्तर समजू शकलेले नाही मात्र संजूबाबाने लिकर अर्थात मद्य यासाठी ही गुंतवणूक केल्याचे समजते.
नुकतेच पहिले उत्पादन लाँच केले
कंपनीने नुकतेच आपले पहिले उत्पादन लाँच केले आहे. ही ग्लेनवॉक नावाची मिश्रित स्कॉच व्हिस्की आहे. कंपनी आपल्या प्रोफाइलमध्ये वोडका, टकीला, सिंगल माल्ट सारखी उत्पादने जोडण्याची तयारी करत आहे.