मुंबई – दक्षिण चित्रपटसृष्टीतील हिट मशीन म्हणून प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक पुरी जगन्नाथ आणि बॉलिवूडचा संजू बाबा अर्थात संजय दत्त एका आगामी चित्रपटानिमित्त एकत्र आले आहेत. कोणतेही दृश्य बारकाईने चित्रित करण्याची पुरी जगन्नाथ यांची शैली इतर दिग्दर्शकांपेक्षा खूपच वेगळी आहे.2019 मध्ये ब्लॉकबस्टर चित्रपट ‘आयस्मार्ट शंकर’ दिल्यानंतर आता ते त्याचा सिक्वेल ‘डबल आयस्मार्ट’ प्रेक्षकांसमोर आणणार आहे. या चित्रपटात संजय दत्तही असणार आहे.
पुरी जगन्नाथ यांनी संजू बाबाला त्याच्या वाढदिवसानिमित्त एक खास गिफ्ट दिल आहे. ज्यामुळे साऊथसह बॉलीवूडला देखील संजय दत्त केजीएफनंतर पुन्हा साऊथ सिनेमात झळकणार असलयाचे समजले. संजय दत्तचा या चित्रपटातील टेरर लूक त्याच्या वाढदिवसानिमित्त दिग्दर्शकाने समोर आणला आहे. पुरी जगन्नाथ यांच्या चित्रपटात संजय दत्त ‘बिग बुल’ ही व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.
चेहऱ्यावर गंभीर भाव,सिगार ओढताना, कानात झुमके आणि कपाळाच्या डाव्या बाजूला टॅटू असा संजय दत्तचा आगळावेगळा लूक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यावरून तो पुन्हा निगेटिव्ह रोलमध्ये दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
संजय दत्तने याबाबत एक पोस्ट लिहीत आपला नवा लूक सगळ्यांसोबत शेअर केला आहे. चित्रपटातील त्याच्या लूकचे पोस्टर शेअर करत संजय दत्तने पुरी जगन्नाथसोबत काम केल्याचा आनंद व्यक्त केला. त्याने लिहिले, “दिग्दर्शक पुरीजगन्नाध यांच्यासोबत काम करणे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. या साय-फाय मास एंटरटेनरमध्ये बिग बुल साकारून आनंद झाला.”
It takes me immense pride to be working with the director of the masses #PuriJagannadh ji and the young energetic Ustaad @ramsayz 🤗
Glad to be Playing the #BIGBULL in this sci-fi mass entertainer #DoubleISMART
Excited to be teaming up with this super-talented team and Looking… pic.twitter.com/SrIAJv6yy1
— Sanjay Dutt (@duttsanjay) July 29, 2023
हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच 8 मार्च 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘डबल स्मार्ट’ हा संपूर्ण भारतात रिलीज होणारा चित्रपट आहे, जो हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.