IND vs AUS : पहिल्या सामन्यात फ्लॉप, तरी रोहित शर्माने गाठला ‘हा’ ऐतिहासिक टप्पा

रोहित शर्माने केला खास पराक्रम –
या सामन्यात रोहित शर्माने एक खास टप्पा गाठला आहे. हा त्याचा भारतासाठी 500 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि राहुल द्रविड यांनीच हा टप्पा गाठला होता. आता रोहित शर्मा 500 किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे.
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे भारतीय खेळाडू:
- सचिन तेंडुलकर: 664 सामने
- विराट कोहली: 551 सामने
- महेंद्रसिंग धोनी: 535 सामने
- राहुल द्रविड: 504 सामने
- रोहित शर्मा: 500 सामने
हेही वाचा – Ranji Trophy 2025 : ऋतुराज-पृथ्वीच्या खेळीवर पावसाने फेरलं पाणी, महाराष्ट्र-केरळ सामना अनिर्णीत!
भारताची खराब सुरुवात रोहित-विराट अपयशी –
🚨 Adam Gilchrist – They say Rohit Sharma is a match-winner. They just never said for which side. (Laughs)
He is cooking him silently. 🤣🤣🤣pic.twitter.com/A5yhBOCFV1
— zoxxy (@PrimeKohli) October 19, 2025
या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. भारताने 25 धावांवर रोहित शर्मा, विराट कोहली आणि कर्णधार शुबमन गिल यांच्या विकेटस् गमावल्या. रोहितने 8 धावा केल्या, तर विराट कोहली खाते न उघडताच बाद झाला. रोहितला जोश हेझलवूडने, तर विराटला मिचेल स्टार्कने बाद केले. कर्णधार शुबमन गिलही केवळ 10 धावांवर नॅथन एलिसचा बळी ठरला. सध्या 11.5 षटकानंतर पावसामुळे खेळ थांबला असून भारताने 3 बाद 37 धावा केल्या असून श्रेयस (6) आणि अक्षर (7) नाबाद आहेत.
रोहितची वनडेमधील आतापर्यंतची कामगिरी –
रोहित शर्मा हा भारताचा सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. त्याचा पुल शॉट खरोखरच प्रशंसनीय आहे. वनडे क्रिकेटमध्ये तीन दुहेरी शतके ठोकणारा तो एकमेव फलंदाज आहे. 2007 मध्ये त्याने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून तो भारतीय संघाचा अविभाज्य भाग आहे. त्याने 274 वनडे सामन्यांमध्ये 11,169 धावा केल्या असून, यामध्ये 32 शतके आणि 58 अर्धशतकांचा समावेश आहे.





