Rohit Sharma : रोहित शर्मा २०२७ च्या विश्वचषकापर्यंत कर्णधार? आयसीसीच्या पोस्टरमुळे चर्चेला उधाण!

आयसीसीच्या पोस्टरमुळे चर्चेला उधाण –
ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी आयसीसीने रोहित शर्माशी संबंधित एक पोस्टर जारी केले आहे, ज्यामुळे सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. या पोस्टरमुळे असे संकेत मिळत आहेत की, रोहित शर्मा 2027 च्या वनडे विश्वचषकापर्यंत भारतीय संघाचे नेतृत्व करू शकतो. हे पोस्टर 2026 मध्ये भारताच्या इंग्लंड दौऱ्याशी संबंधित आहे, जिथे भारतीय संघ पाच टी-20 आणि तीन वनडे सामने खेळणार आहे.
ICC POSTER FOR INDIA Vs ENGLAND WHITE BALL SERIES IN 2026. 🇮🇳
– Rohit Sharma & Harry Brook in the poster..!!!! pic.twitter.com/l7Q5rtD3vR
— Tanuj (@ImTanujSingh) August 8, 2025
या पोस्टरमध्ये रोहित शर्मासह इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक यांचाही फोटो आहे. आयसीसीने दोन्ही संघांच्या कर्णधारांसह हे पोस्टर जारी केले होते, ज्यामुळे रोहित 2027 च्या विश्वचषकापर्यंत कर्णधारपद सांभाळेल अशी चर्चा सुरू झाली. मात्र, विशेष बाब म्हणजे, आयसीसीने काही वेळानंतर हे पोस्टर आपल्या सोशल मीडिया खात्यांवरून हटवले. पण तोपर्यंत ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती आणि अनेकांनी ती शेअरही केली होती.
गौतम गंभीर यांचे स्पष्टीकरण –
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने याबाबत स्पष्ट केले की, 2027 च्या विश्वचषकाबाबत आता काहीही बोलणे घाईचे ठरेल. गंभीर म्हणाला, “आमच्याकडे आधी टी-20 विश्वचषक आहे. त्यानंतरच वनडे विश्वचषकाबाबत विचार केला जाईल.” टी-20 विश्वचषकाचे यजमानपद भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. त्यापूर्वी रोहित शर्माची वनडे क्रिकेटमधील कामगिरी कशी राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
हेही वाचा – Hit Wicket Debate : आउट की नॉट आउट? फलंदाजाने शॉट खेळला अन् टोपीने बेल्स पडल्या, VIDEO होतोय व्हायरल
रोहितच्या भवितव्याबाबत अनिश्चितता –
2027 च्या वनडे विश्वचषकाला अजून दोन वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे कोणत्याही खेळाडूच्या भवितव्याबाबत निश्चितपणे काही सांगता येणार नाही. रोहितने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर शुबमन गिलने कर्णधारपद स्वीकारले आणि इंग्लंडमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. दरम्यान, दोन वर्षांनंतर रोहित शर्मा 40 वर्षांचा होईल. त्यावेळी तो खेळत राहील की नाही, हेही पाहावे लागेल.





