Hit Wicket Debate : आउट की नॉट आउट? फलंदाजाने शॉट खेळला अन् टोपीने बेल्स पडल्या, VIDEO होतोय व्हायरल

या व्हिडिओमध्ये फलंदाजाने शॉट खेळला, पण त्यानंतर फलंदाजांची टोपी स्टम्प्सवर पडली आणि बेल्स बेल्स खाली पडल्या. हे पाहून क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने तात्काळ अपील केले. पण खरंच फलंदाज आउट होता का?
हिट विकेटसारखं वाटतंय का?
#SherSquad, out or not out? 😂#FridayFeatures pic.twitter.com/mqkAt7Q199
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) August 8, 2025
क्रिकेटमध्ये आउट होण्याचे अनेक मार्ग आहेत, जसे की बोल्ड, कॅच, एलबीडब्ल्यू, रन आउट, स्टम्प्ड. याशिवाय काही दुर्मिळ, पण वैध मार्गही आहेत. जसे की हिट विकेट, टाइम्ड आउट, रिटायर्ड आउट, ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड आणि बॉलला दोनदा मारणे. हा प्रसंग हिट विकेटसारखा वाटतो.
हेही वाचा – Mohammed Siraj : सिराजच्या घरातील भिंतीवर असलेली एक खास फोटो फ्रेम का होतेय व्हायरल? जाणून घ्या कारण
क्रिकेटचा नियम 35.2 काय सांगतो?
क्रिकेटच्या नियम 35.2 नुसार, जर फलंदाजाची कोणतीही वस्तू, जसं की टोपी, शॉट पूर्ण झाल्यानंतर बेल्स पाडत असेल, तर फलंदाज आउट मानला जाणार नाही. म्हणजेच, जर टोपी शॉट खेळल्यानंतर पडली असेल, तर फलंदाज ‘नॉट आउट’ आहे. पण जर हे गोष्ट बॉल खेळताना घडलं, तर ते हिट विकेट अंतर्गत आउट ठरेल.
व्हायरल व्हिडीओतील फरक अत्यंत सूक्ष्म आहे आणि स्लो-मोशन रीप्लेशिवाय अंपायरलाही गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे चर्चा कायम आहे. मात्र, फलंदाज वरील नियमानुसार फलंदाज नॉट ऑऊट असल्याचे जाणवतयं. पण त्या सामन्यात अंपायरने काय निर्णय दिला याची माहिती उपलब्ध नाही. परंतु तुम्हाला काय वाटतंय अंपायरनी आउट दिला असेल की नॉट आउट?





