Riyan Parag Video : “आम्ही काय फिल्मस्टार नाही भाऊ!” पापाराझींसमोरील रियानचा अॅटिट्यूड पाहून वैभवची रिअॅक्शन होतेय व्हायरल
Riyan Parag Video : विमानतळावरील कर्णधार रियान परागच्या एका अतरंगी वक्तव्यावरील वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Riyan Parag Video Viral with Vaibhav Sooryavanshi: आयपीएलच्या पहिल्यावहिल्या हंगामाचा मानकरी असलेला राजस्थान रॉयल्स संघ मुंबई इंडियन्सचा पराभव करून अखेर प्ले-ऑफसाठी पात्र ठरला आहे. आता २७ मे रोजी हा संघ मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ‘एलिमिनेटर’ सामन्यात भिडणार आहे. इथून पुढे राजस्थानसाठी प्रत्येक सामना हा ‘करो या मरो’ असाच असणार आहे. या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यासाठी संघ रवाना होत असताना, विमानतळावरील कर्णधार रियान परागच्या एका अतरंगी वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
“आम्ही काय फिल्मस्टार नाही भाऊ!” – वैभव बघतच राहिला (Riyan Parag Video)
मुल्लानपूरसाठी उड्डाण करण्यापूर्वी राजस्थान रॉयल्सचे खेळाडू विमानतळावर पोहोचले, तेव्हा तिथे मीडियाच्या कॅमेरामननी (पापाराझी) त्यांना घेरले. कॅमेरामननी कर्णधार रियान पराग आणि १५ वर्षांचा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी यांना एकत्र पोझ देण्याची विनंती केली. यावर आपल्या नेहमीच्या बिनधास्त शैलीत उत्तर देत रियान पराग म्हणाला, “आम्ही काय फिल्मस्टार नाही आहोत भाऊ!” परागने स्पष्ट नकार दिल्यानंतर बाजूला उभ्या असलेल्या निरागस वैभव सूर्यवंशीच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि रिअॅक्शन पाहण्यासारखी होती. हा मजेशीर व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चाहत्यांचे प्रचंड मनोरंजन करत आहे.
View this post on Instagram
राजस्थान रॉयल्ससाठी पुढचा रस्ता अत्यंत कठीण – (Riyan Parag Video)
आयपीएल २०२६ ची सुरुवात राजस्थान रॉयल्सने सलग चार सामने जिंकून दणक्यात केली होती, मात्र त्यानंतर त्यांची लय अचानक बिघडली. पुढील ८ सामन्यांपैकी त्यांना फक्त २ सामन्यांत विजय मिळवता आला. परंतु, लीग स्टेजच्या शेवटच्या दोन सामन्यांत सलग दोन विजय मिळवून परागच्या सैन्याने प्ले-ऑफमध्ये जागा पक्की केली.
राजस्थान रॉयल्स प्ले-ऑफमध्ये पोहोचला असला, तरी त्यांच्यासाठी जेतेपदाचा रस्ता सुकर नाही. आयपीएलमध्ये २०११ पासून प्ले-ऑफ पद्धत सुरू झाली आहे. तेव्हापासून गेल्या १५ हंगामात केवळ एकदाच ‘एलिमिनेटर’ सामना खेळणारा संघ ट्रॉफी जिंकू शकला आहे. उर्वरित सर्व वेळी क्वालिफायर-१ खेळणाऱ्या संघांनीच बाजी मारली आहे. त्यामुळे हा इतिहास बदलण्याचे सर्वात मोठे आव्हान राजस्थानसमोर असेल. (Riyan Parag Video)





