Arshdeep Singh Insta : अर्शदीप सिंगने घेतला मोठा निर्णय! इन्स्टावरुन विराटसोबतच्या व्हिडीओसह तब्बल २०० पोस्ट केल्या गायब
Arshdeep Singh Insta : अर्शदीप सिंगने सततची टीका आणि वाढता वाद पाहून अर्शदीप सिंगने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून तब्बल २०० हून अधिक पोस्ट डिलीट किंवा आर्काइव्ह केल्या आहेत.

Arshdeep Singh Insta Posts Deleted : टीम इंडियाचा आणि पंजाब किंग्सचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) सध्या मैदानावरील कामगिरीपेक्षा मैदानाबाहेरील वादांमुळे प्रचंड चर्चेत आला आहे. मुंबई इंडियन्सचा युवा फलंदाज तिलक वर्मावर (Tilka Varma ) केलेल्या एका कथित आक्षेपार्ह विधानापासून ते सोशल मीडियावरील चाहत्यांसोबतच्या वादापर्यंत, गेल्या काही आठवड्यांत अर्शदीप सातत्याने ट्रोलर्सच्या निशाण्यावर राहिला आहे. याच मानसिक दबावापोटी आता अर्शदीपने एक अत्यंत धक्कादायक पाऊल उचलले आहे.
२०० हून अधिक पोस्ट डिलीट; विराटसोबतची रीलही गायब! (Arshdeep Singh Insta)
सततची टीका आणि वाढता वाद पाहून अर्शदीप सिंगने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून तब्बल २०० हून अधिक पोस्ट डिलीट किंवा आर्काइव्ह केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीपर्यंत त्याच्या अकाउंटवर शेकडो पोस्ट दिसत होत्या, मात्र आता तिथे अवघ्या ४४ पोस्ट उरल्या आहेत. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, यामध्ये टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीसोबतचा २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यानचा त्याचा प्रचंड व्हायरल झालेली रीलदेखील गायब झाली आहे. अर्शदीपच्या या अचानक केलेल्या ‘सोशल मीडिया क्लीनअप’मुळे इंटरनेटवर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
नेमका काय होता तिलक वर्मावरील ‘तो’ वर्णद्वेषी वाद? (Arshdeep Singh Insta)
Team India के तेज गेंदबाज Arshdeep Singh ने अचानक अपने Instagram profile से 200 से ज्यादा पोस्ट हटाकर fans को हैरान कर दिया
उन्होंने अपनी profile photo भी बदल दी और कई पुरानी यादगार posts delete कर दीं#ArshdeepSingh #ViratKohli #PBKS #IPL2026 #Instagram #TeamIndia #cricbull pic.twitter.com/Z3ymGZR97E
— CricBull (@CricBull) May 26, 2026
याच महिन्याच्या सुरुवातीला अर्शदीपने भारतीय खेळाडूंच्या ड्रेसिंग रूममधील मजेशीर क्षणांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र, या व्हिडीओमध्ये अर्शदीपने तिलक वर्माला मजेमजेत ‘अंधेरा’ (काळा/अंधार) असे म्हटले होते. एवढेच नव्हे तर त्याने तिलकला “तू सनस्क्रीन लावली का?” असाही खोचक सवाल केला होता. त्यानंतर नमन धीरकडे बोट दाखवून त्याला “पंजाबचा खरा ग्लो (गोरा रंग)” असे म्हटले. हा व्हिडीओ व्हायरल होताच क्रिकेट वर्तुळात संतापाची लाट उसळली. चाहत्यांनी अर्शदीपवर थेट ‘रंगभेदाला’ प्रोत्साहन दिल्याचा गंभीर आरोप करत त्याला अतोनात ट्रोल केले. या संवेदनशील वादावर अद्याप अर्शदीप किंवा त्याच्या पीआर टीमने कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही.
अर्शदीप पंजाबसाठी ठरला महागडा – (Arshdeep Singh Insta)
पंजाब किंग्सकडून खेळताना अर्शदीपसाठी आयपीएल २०२६ चा हंगाम वैयक्तिक पातळीवर अतिशय महागडा ठरला. त्याने १४ सामन्यांत १४ विकेट्स घेतल्या आणि तो संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज राहिला खरा; परंतु त्याचा इकॉनॉमी रेट तब्बल १०.२० इतका भयंकर राहिला. डेथ ओव्हर्समध्ये त्याने सढळ हाताने धावा खर्च केल्या. सुरुवातीच्या ७ पैकी ६ सामने जिंकूनही पंजाब किंग्सचा संघ अवघ्या १ गुणाने प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. या मैदानातील अपयशाने आणि मैदानाबाहेरील ट्रोलिंगने अर्शदीपवर प्रचंड मानसिक दबाव निर्माण केला आहे.





