Kris Srikkanth Statement : “त्याला बाउन्सर खेळता येत नाही…!” उपकर्णधार तिलक वर्माच्या सुमार फॉर्मवर माजी खेळाडूची सडकून टीका
Kris Srikkanth Statement : माजी मुख्य निवडकर्ते कृष्णमाचारी श्रीकांत यांचा संताप अनावर झाला आहे. त्यांनी तिलकला संघातून तातडीने बाहेर करण्याची थेट मागणी केली आहे

Kris Srikkanth Statement On Tilak Varma Form Sanju Samson Playing XI : भारतीय टी-२० संघाचा उपकर्णधार तिलक वर्माचा (Tilak Varma) खराब फॉर्म सध्या टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत आहे. आयर्लंड दौऱ्यापासून ते इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या सामन्यापर्यंत त्याच्या बॅटमधून एकही मॅच-विनिंग खेळी आलेली नाही. तरीही त्याला सातत्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले जात असल्याने, भारताचे माजी धडाकेबाज सलामीवीर आणि माजी मुख्य निवडकर्ते कृष्णमाचारी श्रीकांत (Kris Srikkanth) यांचा संताप अनावर झाला आहे. त्यांनी तिलकला संघातून तातडीने बाहेर करण्याची थेट मागणी केली आहे.
“तिलकला वेगवान गोलंदाजीपासून वाचवले जातेय!” श्रीकांत यांचा आरोप –
आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना १९८३ च्या विश्वविजेत्या संघाचे सदस्य श्रीकांत म्हणाले, “तुम्ही तिलक वर्माला मुख्य फलंदाज आणि उपकर्णधार बनवता, तरीही त्याला वेगवान गोलंदाजीपासून वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय? मैदानावर त्याला अक्षर पटेलच्या आधी फलंदाजीला पाठवले जात आहे. संघ व्यवस्थापनाला ठाऊक आहे की तिलक शॉर्ट-पिच (बाउन्सर) बॉलिंगसमोर पूर्णपणे अपयशी ठरतो. मी सतत सांगतोय की त्याला संघातून बाहेर काढा, पण कोणी ऐकत नाही.”
Kris Srikkanth said🗣 : “Tilak Verma is the current vice-captain, and he will soon become India’s captain. He must have stopped himself after seeing the pace and bounce in the 3rd game. Tilak is clueless, and I will go in with Sanju Samson in his place,”
[CheekyCheeka] pic.twitter.com/RIn5JYQr2z
— Sports Club (@SportsxClub) July 9, 2026
तिलकवर सडकून टीका करताना ते पुढे म्हणाले, “तो आधीच उपकर्णधार आहे, कदाचित लवकरच त्याला थेट कर्णधार बनवले जाईल. मैदानातील वेग आणि उसळी पाहता कदाचित तिलकने स्वतःच पुढे जाण्यास नकार दिला असावा. तिलकला सध्या खेळातले काहीच समजत नाहीये.”
तिलक ऐवजी सॅमसनला संधी द्या – क्रिस श्रीकांत
तिलक वर्माने आपल्या शेवटच्या सहा डावांत अनुक्रमे १९, ५५, १३, २४, ३ आणि ११ धावा केल्या आहेत, ज्यात त्याचा संथ स्ट्राइक रेट चिंतेचा विषय बनला आहे. श्रीकांत यांच्या मते, तिलक वर्माला बेंचवर बसवून संजू सॅमसनला लोअर-मिडल ऑर्डरमध्ये संधी दिली पाहिजे. विशेष म्हणजे, संजूला ३ डावांत केवळ ५ धावा केल्याच्या कारणावरून संघातून डच्चू देण्यात आला होता, तर तिलकला सलग अपयशानंतरही संधी मिळत असल्याने पक्षपाताचे आरोप होत आहेत.





