पुणे – जम्बो कोविड रुग्णालयामध्ये रुग्ण दाखल करून घेण्याच्या अटी शर्ती शिथिल कराव्यात, अशी मागणी शिवसेनेने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
या जम्बो रुग्णालयात दाखल करून घेताना रुग्णांना आणि नातेवाईकांना मन:स्ताप सहन करावा लागला आहे. त्याबद्दल अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेने याबाबत आयुक्तांना निवेदन दिले आहे.
इंजिनिअरिंग कॉलेज आणि बाणेर येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होण्यासाठी काय करायचे, सेंटरचे हेल्पलाइन नंबर प्रसिद्ध करण्यासह रात्री-बेरात्री कोणताही रुग्ण नाकारण्यात येऊ नये, अशी मागणीही शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, सहसंपर्क प्रमुख प्रशांत बधे, विधानसभा समन्वयक डॉ. अमोल देवळेकर यांनी केली आहे.