मुंबई – बँकेत नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या आणि बँकिंगचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजेच आयबीपीएस (IBPS) ने प्रोबेशनरी ऑफिसर आणि स्पेशलिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया देखील आजपासून म्हणजेच 1 ऑगस्ट 2023 पासून सुरू करण्यात आली आहे. अधिकृत संकेतस्थळावर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.
अर्ज फी आणि शेवटची तारीख
जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार 21 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतात, ही शेवटची तारीख आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या SC, ST, PWBD श्रेणीतील उमेदवारांना 175 रुपये भरावे लागतील. तर इतर सर्व उमेदवारांसाठी अर्जाची फी रु 850 आहे.
IBPS PO आणि SO भरतीच्या मुख्य तारखा
ऑनलाइन नोंदणी आणि एडिट विंडो सुरू होईल – 1 ऑगस्ट 2023
ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख – 21 ऑगस्ट 2023
अर्ज एडिट करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2023
अर्ज फी भरणे – 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2023 पर्यंत
असा करा अर्ज
सर्व उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
त्यानंतर उमेदवारांनी होम पेजवर असलेल्या IBPS PO किंवा SO च्या लिंकवर क्लिक करा.
यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा.
शेवटी तुमचा अर्ज डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.
अधिकृत लिंक IBPS PO
https://ibpsonline.ibps.in/crppo13jun23/
अधिकृत लिंक IBPS SO
https://ibpsonline.ibps.in/crpsp13jun23/