अभिनेता अक्षय कुमारला बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणून ओळखले जाते. अक्षय कुमारचे अनेक अभिनेत्रींसोबत अफेरचे असल्याची चर्चा नेहमीच असते. अक्षयचे अनेक अभिनेत्रीसोबत ब्रेकअपचे झाल्याचे किस्से आजही रंगतात.
अक्षय कुमारचे अनेक ब्रेकअप झाले असले तरी त्याचे अनेक अफेअर्स देखील आहेत, ज्यांची चर्चा आजही बॉलिवूडमध्ये केली जाते. अशात बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन आणि अक्षयबाबत अनेक चर्चा नेहमीच रंगताना दिसतात. असे म्हटले जाते की त्याने आधी रवीना टंडनशी फ्लर्ट केले आणि नंतर तिला मध्येच सोडून दिले. त्यानंतर त्याचे दुसऱ्या अभिनेत्रीशी अफेर्स सुरु झाले.
९० च्या दशकात रवीना टंडनने बॉलीवूडवर राज्य केले, तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने हिट होत होते. तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते होते पण रविनाच मन अक्षय कुमारवर खिळली. पण हे नाते तुटल्यावर ती डिप्रेशनमध्ये गेली. रवीनाने अक्षय कुमारसोबत ब्रेकअप केले तेव्हा ती हे ब्रेकअप सहन करू शकली नाही आणि डिप्रेशनमध्ये गेली. रविनाला यातून बाहेर निघण्यासाठी खूप वेळ लागला. खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता.