नवी दिल्ली – शिवसेनेचे बंडखोर खासदार राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी केलेली निवड पूर्णपणे बेकायदेशीर असून लोकसभाध्यक्षांच्या या निर्णयाविरूध्द शिवसेना न्यायालयात जाणार असल्याची माहिती विनायक राऊत यांनी दिली.
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी केलेली नेमणूक अवैध असल्याचे सांगितले. घटनेनुसार, गटनेता निवडण्याचा अधिकार पक्ष प्रमुखाचा असतो. यानुसार, उध्दव ठाकरे यांनी गटनेतेपदी माझी निवड केली असल्याचे पत्र लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना 13 जून 2019 रोजी लिहिले होते. यामुळे कायद्याच्यादृष्टीने गटनेता मीच आहे, असे राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील 12 खासदारांनी दि. 19 जुलैला बिर्ला यांची भेट घेतली होती. यावेळी राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी, तर भावना गवळी यांची प्रतोदपदी नेमण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी निवड केली जात असल्याची माहिती देणारे सर्कुलर 18 जुलै रोजीचे आहे.
Monkeypox | मंकीपॉक्सचा उद्रेक, जगभरात 14 हजार रुग्ण तर ‘या’ देशात 5 जणांचा मृत्यू
याचा अर्थ काय घ्यायचा? बारा खासदारांनी 19 जुलैला भेट घेतली असताना नियुक्ती 18 जुलैला कशी काय केली जाते? असा शंकावजा प्रश्न राऊत यांनी यावेळी उपस्थित केला. या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आता बिर्ला यांनी आम्हाला कोणतीही माहिती न देता किंवा आपली बाजू मांडण्याची संधी न देता शेवाळे यांची निवड केली आहे. ही निवड पूर्णपणे अवैध आणि बेकायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले.
बंडखोर आमदार-खासदारांना गद्दार म्हणणाऱ्या आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री शिंदे यांचे उत्तर