पुणे – लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या असून, भाजपकडून नियोजन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील विकासकामांची उद्घाटने तसेच भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारीच्या तिसर्या आठवडयात पुणे दौर्यावर येण्याची शक्यता आहे.
मोदी यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडून नियोजन तसेच बैठका सुरू असल्याची चर्चा आहे. विशेषत: दि. १९ फेब्रुवारी रोजी श्री छपत्रती शिवाजी महाराज जयंती आहे. याचे औचित्य साधून पंतप्रधानांच्या दौर्यांचे नियोजन सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. शहरात लोहगाव विमानतळाचे नवे टर्मिनस, मेट्रो सेवेचा विस्तार, कात्रज ते स्वारगेट मेट्रो मार्गाचे भूमिपूजन तसेच समाविष्ट गावांसाठीच्या काही प्रकल्पांचे काम सुरू करण्याचे नियोजन आहे.
त्यातच लोकसभा निवडणूकीची लगबग सुरू झाल्याने पुण्यात भाजपकडून या निमित्ताने शक्तीप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी पंतप्रधानांच्या दौर्याचे औचित्य साधत भाजपकडून विकास कामांसोबतच निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फोडला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.