पुणे- पार्किंगमध्ये मद्य प्राशन करणाऱ्या चौघांनी वकिलाला रिव्हॉल्वर दाखवत कारची बेसबॉल स्टीकने तोडफोड करत 50 हजारांची रोकड असलेली बॅग चोरुन नेली. ही घटना मगरपट्टा येथील मेगा सेंटरच्या पार्किंगमध्ये शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात शुभम कांबळे व त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी ऍड. इजाज मजिद पठाण (34, रा. सातववाडी, हडपसर) यांचे मेगा सेंटरमध्ये कार्यालय आले. ते कामकाज संपवून पार्किंगमधील कारजवळ आले असता, कारपुढे आरोपी बसले होते. त्यांनी आरोपींना बाजूला सरकण्याची विनंती केली. त्याचा राग येऊन आरोपींनी त्यांना मारहाण करुन कारच्या काच फोडल्या आणि रोकड असलेली बॅगही चोरली. जाताना पुन्हा त्यांना रिव्हॉल्वर दाखवून मारहाण केली.