धायरी : स्वच्छतागृहाचे सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे.
सिंहगड रस्ता – धायरी गाव विजय नगर सोसायटी समोर सार्वजनिक स्वच्छतागृह तुंबल्याने मुख्य रस्त्यावर सांडपाणी वाहत असल्याने यातून डास, माशांच्या तसेच उपद्रवी किटकांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे धायरीतील लाखो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत आम आदमी पक्षाचे धनंजय बेनकर यांनी सांगितले की , हेच का तुमचे स्वच्छ भारत अभियान, तात्पुरती मलमपट्टी नको कायमस्वरूपी उपाययोजना करा. स्वतःला मेट्रो सिटी, स्मार्ट सिटी म्हणणाऱ्या पुणे महापालिकेचा जाहीर निषेध. आमदार, नगरसेवक, अधिकारी, स्वच्छता कर्मचारी सर्वांना सदर समस्या गेल्या पाच वर्षांपासून सांगत आहोत मात्र कोणीही लक्ष देत नाही, असा संताप धायरीवासियांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
“धायरीतील सदर तुंबलेले, वाहणारे सांडपाणी याबाबत तातडीने सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयामार्फत उपाययोजना करण्यात येइल. स्वच्छता करण्यात येईल. नागरिकांच्या आरोग्याची काळजी प्रशासनाला आहे.” – प्रदीप आव्हाड, प्रभारी सह आयुक्त