Pune Gramin : चिंबळीत विशेष मतदार यादी पुनर्रचना मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 50 टक्के काम पूर्ण
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनर्रचना मोहिमेला चिंबळी (ता. खेड) येथील (Pune Gramin) नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Pune Gramin : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनर्रचना मोहिमेला चिंबळी (ता. खेड) येथील (Pune Gramin) नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत गावातील सुमारे ५० टक्के नागरिकांनी आपली मतदार गणना पत्रके भरून संबंधित मतदान केंद्र स्तरीय अधिकारी तथा तलाठी राहुल पाटील,बी.एल.ओ संतोष सोनवणे,अशोक म्हांगरे,अक्षय बहिरट यांच्याकडे जमा केली.
आतापर्यंत २ हजार ५०० नागरिकांनी आपली गणना पत्रके सादर केली आहेत.५० टक्के नागरिकांनी (Pune Gramin) आपले कागद पत्रे जमा केली असून शनिवारी या मोहिमेला अधिक प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले.यावेळी बी.एल.ओंच्या मदतीसाठी सचिन घोडके,छाया गायकवाड,अश्विनी रोकडे,संगीता जैद यांचे सहकार्य लाभले.
मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत प्रत्येक पात्र मतदाराने आपली माहिती तपासून आवश्यक त्या दुरुस्तीसह मतदार गणना पत्रक वेळेत (Pune Gramin) सादर करणे अपेक्षित आहे. गावातील बूथस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन नागरिकांना या प्रक्रियेची माहिती देत असून मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती, पत्ता बदल तसेच नवीन मतदारांची नोंदणी याबाबत मार्गदर्शन करत असल्याची माहिती अधिकारी राहुल पाटील यांनी दिली आहे.
प्रशासनाच्या वतीने उर्वरित नागरिकांनीही कोणताही विलंब न करता आपले मतदार गणना पत्रक भरून संबंधित बीएलओकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मतदार यादीतील अचूक माहिती ही लोकशाही प्रक्रियेचा महत्त्वाचा आधार असल्याने प्रत्येक पात्र नागरिकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मतदानाचा घटनात्मक अधिकार प्रभावीपणे बजावण्यासाठी मतदार यादीत (Pune Gramin) नाव व माहिती अचूक असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे चिंबळीतील सर्व नागरिकांनी या विशेष पुनर्रचना मोहिमेला सहकार्य करून निश्चित मुदतीत आपली प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






