प्रकरणाची पुणे पोलिसांनी सांगितली सर्व माहिती; आतापर्यंत ८ जणांना घेतलं ताब्यात

Pune Police Ayush Komkar | पुण्यातील नाना पेठ परिसरात 5 सप्टेंबर रोजी, 19 वर्षीय आयुष गणेश कोमकरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. गेल्या वर्षी पुण्यात वनराज आंदेकर याची हत्या झाली होती. याच हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने आयुष कोमकरला गोळ्या घातल्या, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली.
या सगळ्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत या प्रकरणातील माहिती दिली आहे. या प्रकरणात 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात टिपू पठाण टोळीचा देखील सहभाग असल्याचं उघड झालं आहे.
हत्येमागील कारण
पोलिस तपासातून समोर आलं आहे की, गेल्या वर्षी आयुषचा वडील गणेश कोमकर आणि सोमनाथ गायकवाड यांच्या टोळीने वनराज आंदेकर यांची कोयत्याने आणि गोळ्या घालून हत्या केली होती. या हत्येला एक वर्ष पूर्ण होताच, आंदेकर टोळीने बदला घेण्याचा कट रचला. आयुष कोमकर हा या हत्येतील मुख्य आरोपी गणेश कोमकरचा मुलगा होता, ज्यामुळे तो आंदेकर टोळीच्या निशाण्यावर आला.
याबाबत अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख यांनी सांगितलं, “ही हत्या सुनियोजित होती. आंदेकर टोळीने गायकवाड गटावर हल्ला करण्याचा मूळ प्लॅन रचला होता, पण आयुषला लक्ष्य केलं गेलं. या प्रकरणात 8 जणांना अटक केली आहे, ज्यात सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, वृंदावनी निलंजय वाडेकर, यश पाटील, अमन पठाण, अमित पाठोळे आणि सुजल मेरगुळ यांचा समावेश आहे.
यश पाटील आणि अमन पठाण यांनी गोळीबार केला, तर अमित पाठोळे आणि सुजल मेरगुळ यांनी शस्त्र पुरवठा आणि रेकी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे, टिपू पठाण टोळीने आंदेकर टोळीला मदत केल्याचं समोर आलं आहे. Pune Police Ayush Komkar |
पोलिसांचा तपास आणि कारवाई
पुणे पोलिसांनी या प्रकरणात तत्परतेने कारवाई करत 8 आरोपींना अटक केली आहे, तर 5 जण अजूनही फरार आहेत. पोलिस आयुक्त देशमुख फरार आरोपींचा शोध घेत असल्याचे सांगितले. तसेच पोलिसांनी आंदेकर टोळीच्या सर्व हितचिंतकांना इशारा दिला आहे.
सोशल मीडियावर या गँगशी संबंधित रील्स अपलोड करणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. तसेच या गँगविरोधात तक्रार असल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे. Pune Police Ayush Komkar |
हेही वाचा :
सई ताम्हणकरसोबत वेबसीरिजमध्ये एकत्र काम करणार का? प्रिया बापटने दिले खास उत्तर





