Priya Bapat And Sai Tamhankar | अभिनेत्री प्रिया बापट तिच्या टीमसह सध्या ‘बिन लग्नाची गोष्ट’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान नुकतेच तिने तिच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सशी संवाद साधला. यावेळी तिने चाहत्यांनी विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे दिले. तिने अभिनेत्री सई ताम्हणकरसोबत सिरिज करण्याविषयी देखील सांगितले आहे. प्रियाने Ask me a Questions या सेशनमध्ये तिच्या चित्रपटासह वैयक्तिक आयुष्यातील विविध प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी एका इन्स्टाग्राम युजरने, ‘सई ताम्हणकर आणि तुला एकत्र एखाद्या वेब सीरिजमध्ये बघायला आवडेल,’ अशी प्रतिक्रिया दिली. यावर प्रियाने म्हटले की, ‘मलाही सईसोबत काम करायला खूप आवडेल, काय म्हणतेस सई? आणि मेकर्स तुम्ही जर हे पाहत असाल तर, आम्हा दोघींना ‘वजनदार’ सिनेमानंतर पुन्हा एकदा एकत्र काम करता येईल असं काहीतर रंजक कथानक कृपया लिहा,’ असे प्रियाने उत्तर दिले आणि सईनेही तिचा व्हिडिओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. सईने ‘ड्रीम’ असे कॅप्शन देऊन प्रियाचा हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. Priya Bapat And Sai Tamhankar | सई आणि प्रिया दोघीही मराठीतील आघाडीच्या अभिनेत्री आहेत. दोघीही एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यांनी 2016 साली ‘वजनदार’ या सिनेमात एकत्र काम केले होते. सई आणि प्रियाने हिंदी अभिनय क्षेत्रातही काम केले आहे. त्यांच्या सिनेमा- वेबसीरिजसाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. मात्र आता सई आणि प्रियाला पुन्हा एकत्र प्रोजेक्टमध्ये पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत. Priya Bapat And Sai Tamhankar | दरम्यान, ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा सिनेमा 12 सप्टेंबर रोजी रीलिज होणार आहे. या चित्रपटात प्रियासह तिचा पती अभिनेता उमेश कामत मुख्य भूमिकेत आहे. डॉ. गिरीश ओक आणि निवेदिता सराफ हे देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हेही वाचा: Sanjay Raut : शिंदेच्या आमदाराच्या दाव्यावर संजय राऊतांचा खोचक टोला; मागचं पुढचं सगळचं काढलं म्हणाले…