Pune news : वडगावशेरी मतदारसंघामध्ये नऊ टक्क्यांनी मतदान वाढले

Updated On:
Pune news : वडगावशेरी मतदारसंघामध्ये नऊ टक्क्यांनी मतदान वाढले

पुणे  – वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ८३ हजार ५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. यात १ लाख ४७ हजार ५६८ पुरुष, तर १ लाख ३५ हजार ४७२ महिला व १८ अन्य मतदारांचा समावेश आहे. यंदा एकूण ५६.२१ टक्के अंतिम मतदान झाले असून, २०१९ मध्ये ४६.९७ टक्के मतदान झाले होते. या वेळी मतदानामध्ये ९.२४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

निवडणुकीच्या रिंगणात एकूण १६ उमेदवार होते, तर ४४८ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. मतदारसंघात ५ लाख ३ हजार ५३९ मतदार असून, २ लाख ५९ हजार ४५३ पुरुष, तर २ लाख ४३ हजार ९८४ महिला मतदार आहेत. १०२ पारलिंगी मतदार आहेत. बुधवारी (दि. २०) पुरुषांचे मतदान ५६.८८, महिलांचे ५५.५२ टक्के मतदान झाले.अन्य मतदारांचे १७.५६ टक्के मतदान झाले.

तांत्रिक बिघाडामुळे चार मतदान केंद्रांतील ईव्हीएम मशिन बंद पडले होते. यात कळस येथील एमजीएम स्कूल, विश्रांतवाडी येथील जनता हायस्कूल, चंदनगरमधील हंबीरराव कृष्णराव मोझे शाळा, खराडी येथील आदर्श प्राथमिक शाळा येथील मशिनचा समावेश आहे. बिघाड झालेले मशिन बदलल्यानंतर मतदान प्रक्रिया व्यवस्थितपणे सुरू झाली.

आणखी संबंधित बातम्या

Pune News : खड्ड्यामुळे मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबाला सहा लाखांची नुकसानभरपाई द्या; श्रीनाथ भिमाले यांची आयुक्तांना सुचना

2026-08-23 19:55:07

Pune News : खड्ड्यामुळे मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबाला सहा लाखांची नुकसानभरपाई द्या; श्रीनाथ भिमाले यांची आयुक्तांना सुचना

Chhagan Bhujbal : "मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही" - छगन भुजबळ

2026-08-23 18:31:57

Chhagan Bhujbal : "मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही" - छगन भुजबळ

Gunaratna Sadavarte : मनोज जरांगेंबद्दल वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा

2026-08-23 17:25:23

Gunaratna Sadavarte : मनोज जरांगेंबद्दल वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा

Shweta Tiwari : "राज ठाकरेंशी संबंध जोडणं हा शुद्ध मूर्खपणा.."; अभिनेत्री श्वेता तिवारीच्या आरोपांवर शालिनी ठाकरे संतापल्या, पोस्ट चर्चेत !

2026-08-23 16:51:13

Shweta Tiwari : "राज ठाकरेंशी संबंध जोडणं हा शुद्ध मूर्खपणा.."; अभिनेत्री श्वेता तिवारीच्या आरोपांवर शालिनी ठाकरे संतापल्या, पोस्ट चर्चेत !

Devendra Fadnavis : "राहुल यांचा महिला सक्षमीकरणाचा मुद्दा ढोंगी" - देवेंद्र फडणवीस

2026-08-23 16:11:36

Devendra Fadnavis : "राहुल यांचा महिला सक्षमीकरणाचा मुद्दा ढोंगी" - देवेंद्र फडणवीस