वाघोली : आव्हाळवाडी तालुका हवेली येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी मंगेश सातव यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्रशांत सातव यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक घेण्यात आली.
सरपंच नितीन घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निवडणुकीत मंगेश सातव यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा सचिव गणेश कुटे यांच्या हस्ते मंगेश सातव यांचा निवडीबद्दल सत्कार करण्यात आला.
निवडीबद्दल पंचायत समिती हवेलीचे माजी सभापती नारायण आव्हाळे, माजी उपसरपंच संदेश आव्हाळे, उद्योजक संतोष पायगुडे, बापूसाहेब कंद, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ आव्हाळे, अविनाश कुटे, विशाल कुटे, आदींनी अभिनंदन केले आहे.