गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय; ‘या’ दिवशी असणार पूर्णत: दारू बंदी

Ganeshotsav 2025 | गणरायाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे बाप्पाच्या स्वागतासाठी राज्यभरात गणेशभक्तांची लगबग सुरू झाली आहे. पुण्यात दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा देखील सज्ज आहे. पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
गणपती आगमन आणि विसर्जन दिवशी संपूर्ण पुणे जिल्ह्यात दारूबंदी घोषित करण्यात आली आहे. २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या काळात पुणे शहरातील खडक, विश्रामबाग आणि फरासखाना पोलीस ठाण्यातील अंतर्गत येणाऱ्या सर्व दारू विक्रेत्यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.
तसेच पाचव्या आणि सातव्या दिवसाच्या गणपती विसर्जन मिरवणूक मार्गावर देखील दुकान बंद राहणार आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्या विरोधात प्रशासनाकडून कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. Ganeshotsav 2025 |
वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पुणे पोलिसांचे व्यापक नियोजन
यंदाच्या गणेशोत्सवात पुणेकरांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी पुणे पोलिसांनी व्यापक नियोजन केले आहे. मेट्रो प्रकल्पामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी आधीच कंबर कसली आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी प्रमुख गणेश मंडळांची पाहणी करून वाहतूक आणि सुरक्षा तयारीचा आढावा घेतला. Ganeshotsav 2025 |
गणेशोत्सवात शहरात वाढणारी गर्दी, मेट्रो कामामुळे निर्माण होणारे अडथळे लक्षात घेऊन वाहतूक शाखेने विशेष आराखडा तयार केला आहे. ट्रॅफिक इम्पॅक्ट ॲनालिसीसाठी विशेष पथके तयार केली आहेत. शहरातील प्रमुख गणेश मंडळांसोबत समन्वय ठेवून संभाव्य गर्दीची ठिकाणे ओळखून उपाययोजना केली जात आहे. स्वारगेट, मंडई व कसबा मेट्रो परिसरातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यावर भर देण्यात येणार आहे. या भागात गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक वळविण्याचा पर्याय ठेवला आहे. Ganeshotsav 2025 |
हेही वाचा :
Pune News : सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेला तरुण जिवंत सापडला; ५ दिवसांचं रहस्य अखेर उकललं?





