पुणे : जून्या पैशाच्या वादातुन धायरी येथील तरुणाचे राहत्या घरातून अपहरण करुन सांगली, तासगाव येथे एका शेड मध्ये कोंडुन मारहाण करुन फ़ोनद्वारे खंडणी मागीतल्या प्रकरणी विजय उर्फ़ सुशांत मधुकर नलावडे (रा.वायफ़ळे सांगली ) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.पी. रागीट यांनी जामीन मंजुर केला आहे. ४ ऑगस्ट २०२३ रोजी उत्तमनगर पोलीस स्टेशन येथे या घटनेची एफआयआर पीड़िताच्या पत्नी द्वारे नोंदवण्यात आला होता. (Pune crime)
या प्रकरणात एकूण टोळीतील ६ आरोपींविरुद्ध अपहरण , खंडणी व मारहाण केल्या संदर्भात गुन्हा दाखल आहे .आरोपीने अॅड. अभिषेक हरगणे, अॅड. ओंकार फडतरे, अॅड. अजिंक्य पोळ अॅड. चैतन्य अभंग यांच्या मार्फ़त जामिनासाठी अर्ज दाख़ल केला होता.(Pune news)
आरोपीचे नाव एफआयआर मध्ये नाही, आरोपी सदर ठिकाणी उपस्थित असल्याचा कोणताही पुरावा नाही, तसेच आरोपीने कोणतीही पैशाची मागणी केलेली नाही, असा युक्तिवाद आरोपी तर्फ़े अॅड. अभिषेक हरगणे आणि वकिलांनी केला. उच्च न्यायालयाचे अनेक न्यायनिवाड्याचे दाखले दिले. बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस पंचवीस हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन न्यायालयाने मंजूर केला.