जामखेड । काल झालेल्या महाविकास आघाडीचे उमेदवार आ निलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रेच्या सभेत प्रहार जनशक्ती पक्षामार्फत भिमराव लेंडे यांनी जाहीर पाठिंबा जाहीर केला होता मात्र त्याच्या या पाठिंबाशी प्रहार पक्षाचा काहीही संबंध नसुन पक्षाप्रमुख ना बच्चु कडु हे जे आदेश देतील त्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला जाईल असे स्पष्टीकरण प्रहारचे तालुकाध्यक्ष नय्युम सुभेदार यांनी स्पष्ट केले
यावेळी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले की प्रहार पक्षाचे प्रमुख नामदार बच्चू कडू यांनी दि.३० रोजी छत्रपती संभाजी नगर येथे झालेल्या लेल्या पदाधिकार्यांच्या बैठकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांना सूचित करण्यात आले होते की मी स्वतः कुठले आदेश देत नाही तो पर्यंत कुठल्याही उमेदवाराला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठींबा किंवा प्रचारात सहभागी होऊ नये.
असे असताना देखील जामखेड या ठिकाणी दि.०९/०४/२०२४ रोजी महाविकास आघाडी अधिकृत उमेदवाराची जनसंवाद यात्रा झाली त्यामध्ये भिमराव लेंडे यांनी पक्ष प्रमुखाचे आदेशाचे उल्लंघन करून महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या व्यासपीठावरून प्रहार जनशक्ती या पक्ष्याचा पाठिबा आहे असे जाहीर केले. तरी हे व्यक्तव्य चुकीचे व खोडसाळ पनाचे असून प्रहार जनशक्ती पक्षाने आतापर्यंत कुठल्याही आघाडी युती च्या उमेदवारास समर्थन/किंवा पाठींबा जाहीर केलेला नाही. त्यामुळे भिमराव लेंडे पा. यांनी जाहीर केलेल्या पाठिंबाशी प्रहार पक्षाचा काहीही संबंध नाही तसेच आदेशाचे उलंघन केले असून लेढे त्यांच्यावर पक्ष शिस्तभंग म्हणून कार्यवाही करण्याची मागणी तालुकाध्यक्ष नय्युम सुभेदार यांनी केली आहे.