इस्रायलने अणुबॉंब तयार केला?
नवी दिल्ली, दि. 7 – इस्रायलने अणुबॉंब तयार केल्याचे खात्रीशीर वृत्त मला समजले आहे, असे इजिप्तचे अध्यक्ष सादत यांनी जाहीर केले. सादत यांनी पुढे असा इशारा दिला की, जर इस्रायलने मध्यपूर्वेत या अणुबॉंबचा वापर केला तर होणाऱ्या परिणामाची सर्व जबाबदारी इस्रायलवर राहील.
इस्रायलने अणुबॉंब आमच्या विरुद्ध वापरला तर 10 लाख इजिप्शियन लोक ठार मारले जातील आणि मला तर एक लाख इस्रायलींना ठार करावयाचे आहे. त्यामुळे इस्रायल देश समूळ नष्ट होईल. मात्र इस्रायली पंतप्रधानांनी आम्ही अणुबॉंब वापरणार नाही आणि पहिल्याप्रथम तर कधीच वापरणार नाही, अशी घोषणा केली होती
आयाराम-गयारामपासून सावधान
कानपूर – विजयालक्ष्मी पंडित यांनी जनता पक्षाच्या नेत्यांना असा इशारा दिला आहे की, त्यांनी जनता पक्षात प्रवेश करणाऱ्या आयाराम गयारामपासून सावध राहावे. कारण या फुटीरांची निष्ठा शंकास्पद आहे. राजकीय फायद्यासाठी ते जनता पक्षात प्रविष्ट होत आहेत. याला योग्य मार्ग म्हणजे या फुटीरांनी आपल्या आमदारकीचे राजीनामे द्यावे व मगच जनता पक्ष प्रवेशासाठी अर्ज करावेत.
भ्रष्टाचार नष्ट करणार
मद्रास – तामीळनाडूचे राज्यपाल प्रभुदास पटवारी यांनी म्हटले की, अण्णा द्रमुक सरकारचे कर्तव्य राहील की, राज्यातून भ्रष्टाचार नष्ट करणे व जनतेला स्वच्छ कारभार पुरविणे.