Poona Club Premier League 2024 : जेट्स, फोर ओक्स सेलर्स उपांत्य फेरीत…

Poona Club Premier League 2024 – पुना क्लब लिमिटेडच्या वतीने आयोजित दहाव्या पुना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट 2024 स्पर्धेत साखळी फेरीत मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स, फोर ओक्स सेलर्स, कपिला परमार ऑल स्टार्स, जेट्स या संघानी उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पुना क्लब क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत सर्वेश मुथा नाबाद ३२ धावांच्या जोरावर ऑल स्टार्स संघाने टायटन्स संघाचा ७ गडी राखून पराभव केला. क्रिश शहा (२-४ व १०धावा) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर टायफुन्स संघाने वॉरियर्स संघाचा ५ गडी राखून पराभव केला.
अन्य लढतीत भार्गव पाठक नाबाद ६४ धावांच्या जोरावर मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स संघाने ओबेरॉय अँड नील किंग्स संघाचा ६ धावांनी पराभव करत आपली विजयी मालिका कायम राखली. प्रतिक सुराणा (नाबाद ९२धावा) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर ईगल्स संघाने पृथ्वी लायन्स संघाचा ६६ धावांनी पराभव करून आगेकुच केली.
Wrestling : निलंबन हटवले, निवडणूकीचे काय! कुस्ती महासंघ जागतिक संघटनेचे ऐकणार का ?
निकाल : (साखळी फेरी)
फोर ओक्स सेलर्स: ६ षटकात १ बाद ८९ (रौनक ढोले पाटील नाबाद ६२, तारिक १९; कुणाल बोरावके १-१५) वि.वि.व्हीके टायगर्स: ६ षटकात २ बाद ८४ (विक्रम काकडे नाबाद ५५; सचिन मेनन १-१४); सामनावीर – रौनक ढोले पाटील





