Women’s Asia Cup 2024 (Semi Final 1) : रेणुका-राधाचा प्रभावी मारा, बांगलादेशचे भारतासमोर केवळ 81 धावांचे लक्ष्य…

T20 Asia Cup 2024 (IND-W vs BAN-W) Semi-Final : महिला आशिया चषक T20 च्या पहिल्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना बांगलादेशशी होत आहे. डंबुला येथील रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. भारतीय संघ महिला आशिया चषक स्पर्धेत सलग नवव्यांदा उपांत्य फेरीत पोहोचला असून सलग नवव्यांदा फायनलमध्ये स्थान मिळवण्याकडे लक्ष आहे. ही स्पर्धा 2004 पासून खेळवली जात आहे आणि टीम इंडिया प्रत्येक आवृत्तीच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 20 षटकांत आठ गडी गमावून 80 धावा केल्या असून भारतासमोर विजयासाठी 81 धावाचंं लक्ष्य ठेवलं आहे. कर्णधार निगार सुलतानाने सर्वाधिक 32 धावांची खेळी खेळली. तर शोर्ना अख्तरने 19 धावा केल्या. याशिवाय बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.
An excellent bowling performance from #TeamIndia has restricted Bangladesh to 80/8 👌👌
3⃣ wickets each for Renuka Singh & Radha Yadav
1⃣ wicket each for Pooja Vastrakar & Deepti SharmaScorecard ▶️ https://t.co/JwoMEaSoyn#INDvBAN | #WomensAsiaCup2024 | #ACC pic.twitter.com/VDiEqqEoRv
— BCCI Women (@BCCIWomen) July 26, 2024
भारताकडून गोलंदाजीत रेणुका सिंग आणि राधा यादव यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. राधाने 20 व्या षटकात दोन विकेट घेतल्या त्याचबरोबर हे षटक निर्धावदेखील टाकले. याशिवाय पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
भारत आठव्या विजेतेपदाच्या मोहिमेवर….
भारताव्यतिरिक्त बांगलादेश हा महिला आशिया कप जिंकणारा एकमेव संघ आहे. भारताने सात वेळा तर बांगलादेशने एकदा विजेतेपद पटकावले आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ आठव्यांदा आशिया चषक जिंकण्याच्या मोहिमेवर आहे. भारताने वनडे फॉरमॅटमध्ये चार आणि टी-20 फॉरमॅटमध्ये तीन जेतेपदे पटकावली आहेत. महिला आशिया चषक 2004 मध्ये सुरू झाला आणि टीम इंडिया त्यावेळी चॅम्पियन बनली. 2008 पर्यंत ही स्पर्धा एकदिवसीय स्वरूपात खेळली जात होती. त्याच वेळी, 2012 पासून ही स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळली जात आहे. ही नववी आवृत्ती आहे आणि भारताने सात वेळा (2004, 2005, 2006, 2008, 2012, 2016, 2022) विजेतेपद पटकावले आहे.





