Wrestling Federation of India – युनायटेड जागतिक कुस्ती महासंघाने भारतीय कुस्ती महासंघावरील निलंबनाची कारवाई मागे घेतली असली तरीही आता महासंघ पारदर्शीपणे निवडणूक घेणार का, हा सवाल कायम राहिला आहे. त्याचबरोबर भारतीय कुस्ती महासंघाकडून आंदोलकर्ते कुस्तीपटू विनेश फोगट व बजरंग पुनिया यांच्यावर कारवाई करणार नाही या शब्दावर भारतीय कुस्ती महासंघ ठाम राहणार का, हा प्रश्नही कायम राहिला आहे.
जागतिक महासंघाने भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबन मागे घेताना पुनिया व विनेशवर कोणतीही कारवाई करणार नाही असे लेखी आश्वासन घेतले आहे. त्यानंतरच महासंघाला सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आले होते. अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेतल्याचे कारण यासाठी देण्यात आले होते. या संदर्भात जातिक महासंघाने खुलासा केला आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये निलंबित करण्यात आले होते. कारण भारतीय संस्था वेळेवर निवडणुका घेण्यात अयशस्वी ठरली होती. शिस्तपालनसमितीनेही निर्णय घेतला होता की महासंघावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी हे पुरेसे कारण आहे. कारण महासंघातील स्थिती तब्बल सहा महिने जैसे थे अशीच होती.
#PKLSeason10 ( #HSvPAT Match 122 ) : हरियाणाचा विजय, पाटणाचा पराभव करत मिळवले प्लेऑफचे तिकीट…
दरम्यान निलंबनाचा आढावा घेण्यासाठी ९ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत जागतिक महासंघाच्या सदस्यांनी भारतीय महासंघावर काही अटी घालत निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला. भारतीय कुस्ती महासंघाला त्यांच्या आयोगाच्या निवडणुका पुन्हा आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. या आयोगासाठी उमेदवार सक्रिय क्रीडापटू असणे आवश्यक आहे किंवा चार वर्षांहून अधिक काळ सेवानिवृत्त झालेला नसावा. मतदार विशेषतः खेळाडू असतील. या निवडणुका १ जुलै २०२४ नंतर कोणत्याही वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान घेतल्या जाव्यात. अशा काही अटी यात आहेत.