औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील महिला आणि पुरुष कीर्तनकाराच्या अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर एकच एकच खळबळ उडाली आहे. एका महिलेसोबत हे कीर्तनकार नको त्या अवस्थेत दिसत असून, याच्या दोन व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. पुरुष आणि महिला दोघंही औरंगाबाद जिल्ह्यातील प्रतिष्ठीत किर्तनकार आहेत. यापैकी महिला किर्तनकाराने विष प्राशान केल्याचं समोर आलं आहे.
किर्तनकार जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे आपली बदनामी होत आहे, हे लक्षात आल्यानंतर महिलेने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे पुरुष किर्तनकारानंही काही टोकाचं पाऊल उचलू नये म्हणून महाराजांवर त्यांचे नातेवाईक लक्ष ठेवून आहेत.
अश्लिल व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाराजांवर कारवाई करण्याची मागणी वारकरी संप्रदायातून करण्यात येत आहे. यातील पुरुष किर्तनकार ४८ वर्षाचे असून ते वैजापूर तालुक्यातील आहे. तर महिला किर्तनकार ४० वर्षांच्या असून सिल्लोड तालुक्यातील आहेत.
धक्कादायक म्हणजे, शारिरीक संबंधावेळीचा व्हिडीओ खुद्द महाराजांनी शुट केला आहे. अशा प्रकराच्या दोन व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर फिरत असून वारकरी संप्रदाय या घटनेमुळे आक्रमक झाला आहे.