फिरायला जायला कोणाला आवडत नाही? काहीजण मित्रांबरोबर जातात, तर काही जण त्यांच्या साथीदाराबरोबर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. देशातील अश्याच काही ठिकाणांबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत.ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा पर्यटनाचा प्लॅन करू शकता.
मेघालय : बाराही महिने ओला असणारा प्रदेश म्हणून मेघालयला ओळखले जाते. जर तुम्हाला उन्हाळ्यात फिरायला जायचे असेल तर मेघालयला नक्की भेट द्या. या ठिकाणी विशिष्ट केशरी रंगाची फुले अत्यंत प्रसिद्ध आहेत.तसेच मेघालयमधील चेरापुंजी, शिलाँग, गुवाहाटी, मावलिंयाँग हि येथील काही प्रसिद्ध ठिकाणं आहेत.
उत्तराखंड : देवभूमी म्हणून ओळख असलेले उत्तराखंड हे ठिकाण फिरण्यासाठी उत्तम आहे. हा भाग निसर्गाने नटलेला असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी हिरवळ पाहायला मिळेल. त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट अशी की, उत्तराखंडमध्ये या दिवसात अनेक नवी फुलं फुलतात. उत्तराखंड हृषिकेश, जीम कॉरबेट, नैनिताल, हरिद्वावर, येथील नॅशनल पार्क या ठिकाणांना तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता.
केरळ : निसर्गाने नटलेल्या केरळला तुम्ही उन्हाळ्यात फिरायला जाऊ शकता. जर तुम्हाला हिरवागार निसर्ग, चहाचे मळे आणि प्रसन्न वातावरण अनुभवायचे असेल तर तुम्ही केरळला नक्कीच जायला हवे. तसेच केरळमध्ये गेल्यानंतर मुन्नार, पेरियार, एरव्हीकुलम नॅशनल पार्क, टेकडी, कोच्ची अशा काही ठिकाणांना हमखास भेट देऊ शकता.
लेह लडाख : उन्हाळ्यात सहलीचा प्लॅन करत असाल तर लेह लडाख हा उत्तम पर्याय आहे. तुम्हाला या दरम्यान स्पिटी व्हॅली, पँगकाँग लेक, नुबरा व्हॅली, लेह ते कारगिल असे बरेच काही या काळामध्ये करता येऊ शकते.