मुंबई – अनन्या पांडे नुकतीच मुंबईतील एका कार्यक्रमात दिसली. यादरम्यान तिने पिंक कलरच्या ड्रेससोबत बकेट स्टाइल बॅग कॅरी केली होती. त्यावेळेसच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ज्यावर लोक अनन्या पांडेबद्दल मजेदार प्रश्न विचारत आहेत.
एरवी हॉट शॉट ड्रेसमध्ये पार्ट्यांमध्ये दिसणारी अनन्या यावेळी काही वेगळ्या अंदाजात दिसली. एका कार्यक्रमात सामील होताना तिने असा काही ड्रेस परिधान केला कि सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या. त्याहूनही महत्वाचे म्हणजे तिने सोबत घेतलेली पर्स जास्त चर्चेचा विषय ठरली. एखाद्या बादलीच्या आकाराची असलेली ही हटके पर्स देखील चांगलीच व्हायरल होत आहे.
अनन्याच्या हातात असलेली पर्स सोनेरी रंगाच्या बादलीच्या आकाराची होती. नेटिझन्सनी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. ‘दाल तडक्याची पर्स’ अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने लिहिले या पर्सचा आकार अनण्याच्या पर्स इतका आहे. अशा अनेक मजेशीर कमेंट अनन्याच्या या व्हिडिओवर येताना दिसत आहेत.
View this post on Instagram
अनन्या बॉलिवूडमध्ये आपल्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते. तशीच ती स्पष्टपणासाठी देखील प्रसिद्ध आहे. आता बॉलिवूड बॉयकॉटबाबत अनन्याने स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. बॉयकॉटबाबत ती म्हणाली ,”दररोज कोणावर तरी बहिष्कार टाकला जातो. आता सर्वांनी या गोष्टी गांभीर्याने घेणे बंद केले आहे. अनन्याने उलट प्रश्न विचारला की, तुम्हीच सांगा की बॉलीवूडमध्ये असा कोण आहे ज्यावर बहिष्कार टाकला गेला नाही.