पिंपरी – राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या दोन घटना सोमवारी (दि. 26) उघडकीस आल्या. पहिली घटना चिंचवड तर दुसरी घटना पिंपरी येथे घडली.
मोहम्मद मुसलम शेख (वय 49, रा. चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शेख यांनी राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. सोमवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. शेख यांनी यापूर्वीही दोनवेळा रेल्वेखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. चिंचवड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत निशा अरूण मोरे (वय 18, रा. गांधीनगर, पिंपरी) यांनी राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.