भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन : विविध धार्मिक कार्यक्रम
तळेगाव ढमढेरे – शिरूर तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथील पांडुरंगाच्या मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दिवसभर मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
विठ्ठल मंदिरात पहाटे ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने पूजा, अभिषेक, व महाआरती करण्यात आली. हा विधी जिल्हा बॅंकेचे संचालक प्रदीप कंद, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, गटविकास अधिकारी महेश डोके, शुभांगी मस्के, विस्तार अधिकारी राम राठोड, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला.
दिवसभर मंदिरामध्ये भजन, कीर्तन, दिंड्या- प्रदक्षिणा आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने केले होते. कार्यक्रमासाठी जिल्हा बॅंकेचे माजी संचालक निवृत्ती गवारे, संभाजी गवारे, भाजपचे पुणे जिल्हा कामगार आघाडीचे अध्यक्ष जयेश शिंदे, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष काळूराम गवारे, सरपंच शंकर धुळे, माजी उपसरपंच महेंद्र गवारे, सोपान गवारे, ज्योती गवारे, सामाजिक कार्यकर्ते अमोल गवारे, सुनील गवारे, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळासाहेब गवारे, दिलीप गवारे, पोलीसपाटील शरद लोखंडे, मंडलाधिकारी राजू आळणे, ग्रामविकास अधिकारी सचिन काळेल,
ग्रामसेवक डी. एन. कुंभार,उद्योजक संदीप गवारे, संतोष गवारे, के. टी. कोतवाल, प्रशांत गवारे, दादासाहेब गवारे उपस्थित होते. भाविकांसाठी महेंद्र गवारे, राहुल गवारे आणि मुकेश चौधरी यांच्या वतीने फराळाची तसेच ओंकार गवारे यांच्या वतीने अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती. मंदिर फुले सजावट प्रथमेश डेकोरेशन सुनील गवारे यांच्या वतीने केले होते.