नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सुरक्षेमध्ये मोठी चूक झाल्याची घटना घडली आहे. लोकसभेचे कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीमधून दोन जणांनी सभागृहात उडी मारली. . त्यानंतर हे दोघेही गॅस घेऊन प्रेक्षक गॅलरीत आले. तिथून हे दोघेही सभागृहात शिरले. त्यामुळे लोकसभेत एकच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. लोकसभेबाहेर कलर स्मोक अर्थात रंगीत धुराच्या नळकांड्या घेऊन आंदोलन केल्याने दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यापैकी एक जण महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील आहे.
या निमित्ताने संसदेच्या सुरक्षेचा पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर लोकसभेचं कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आलं. या संपूर्ण प्रकरणाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ही घटना घडली तेव्हा आम्ही त्याठिकाणीच होते. नेमकं काय घडलं हे कोणाच्याही लक्षात आले नाही. सुरुवातीला वाटले कोणीतरी पडले आहे. काही खासदारांना उलटी, मळमळल्या सारखे होऊ लागले. नेमका यावेळी काय घोषणा दिल्या जात होता. याची कल्पना नव्हती. मात्र या घटनेनंतर एकच धावपळ झाली आहे. तसेच स्मोक कँडलचा धूर बाहेरपर्यंत आला. सध्या तरी यावर इतक्या लवकर भाष्य करणे योग्य ठरणार नाही.”
लोकसभेबाहेर कलर स्मोक अर्थात रंगीत धुराच्या नळकांड्या घेऊन आंदोलन केल्याने दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यापैकी एक जण महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातला आहे. लोकसभेबाहेरील नियमबाह्य आंदोलनामुळे पोलिसांनी एक महिला आणि एका पुरुष आंदोलकाला ताब्यात घेतलं आहे. यामध्ये नीलम कौर सिंह ही 42 वर्षीय महिला हिस्सार हरियाणातील आहे. तर 25 वर्षीय अमोल शिंदे हा लातूर जिल्ह्यातील आहे.