Pankaja Munde । Manoj Jarange Patil : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीबाबत समाजाची भूमिका निश्चित करण्यासाठी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटीत बैठक बोलवण्यात आली होती.
या बैठकीनंतर जरांगे पाटलांनी निवडणुकीविषयी आपली भूमिका स्पष्ट करत मोठी घोषणा केली आहे. “लोकसभेला एका मतदारसंघात शेकडो मराठा उमेदवार उभे केल्यास मत फुटतील. । Pankaja Munde । Manoj Jarange Patil
त्यापेक्षा जिल्ह्यातून एकच अपक्ष उमेदवार द्या आणि त्याच्या मागे संपूर्ण ताकद उभी करा, कोणाला उमेदवारी द्यायची त्याचा निर्णय तुम्ही घ्या. ते मी सांगणार नाही,” असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.
दरम्यान, यावेळी जरांगे पाटील चांगलेच आक्रमक सुद्धा झालेले पाहायला मिळाले. काल पंकजा मुंडे यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज मनोज जरांगे पाटील आक्रमक झालेले पाहताच मुंडे यांचा नरमाईचा सूर पाहायला मिळलाय.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून पंकजा मुंडे यांचा ताफा जात असताना काही मुलांनी हातामध्ये काळी झेंडे धरून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. । Pankaja Munde । Manoj Jarange Patil
मात्र अशा प्रकारचे गुन्हे दाखल करू नयेत, अशी मागणीच पंकजा मुंडे यांनी पोलिसांकडे केली आहे. पंकजा मुंडे यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रामध्ये ती लहान मुले आहेत. केवळ झेंडे दाखवले म्हणून लहान मुलावरती गुन्हे दाखल करू नका अशी विनंती या पत्रातून केली आहे.