मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. कुणाला संधी मिळणार आणि कुणाला नाही ? याबाबत राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा सुरु असताना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून संभाव्य उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. पंकजा मुंडे यांना भाजपकडून डच्चू देण्यात आल्याचे दिसते आहे. तर त्यांच्या ऐवजी भाजपने इतर नावांना संधी दिली आहे याबाबतची आधिकृत माहिती भाजप कडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी की केन्द्रीय चुनाव समिति ने उत्तर प्रदेश, महाराष्ट्र एवं बिहार राज्यों में होने वाले आगामी विधान परिषद द्विवार्षिक चुनाव- 2022 हेतु निम्नलिखित नामों पर अपनी स्वीकृति प्रदान की। pic.twitter.com/cOzfHhaDQY
— BJP (@BJP4India) June 8, 2022
विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे यांना भाजपकडून संधी दिली जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना पंकजा यांना सोडून भाजपने प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड या पाच नावांना उमेदवारीची संधी दिली आहे. भाजप पक्षाने ट्विट करीत बिहार , महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांच्या विधान परिषद उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे.
दरम्यान पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारल्यामुळे मुंडे समर्थकांमुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. शिवाय यापूर्वी संधी दिल्यास संधीचे सोने करू असे पंकजा मुंडे यांनी म्हण्टले होते. मात्र भाजपने पंकजा यांना संधी दिली नसल्याने भाजपने पंकजा यांना का डावलले ? याबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु आहे.