चॅंगवॉन – भारताची नवोदित नेमबाज अंजुम मुदगिल हीने येथे सुरु असलेल्या आयएसएसएफ विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत ब्रॉंझपदकाला गवसणी घातली. महिलांच्या 50 मिटर थ्री पोझिशन एअर रायफल गटात तीने ही कामगिरी करताना 402-9 गुणांची नोंद केली व तिसरा क्रमांक मिळवला.
या गटात जर्मनीच्या अ्रना जेन्सनने 407-9 गुणांसह सुवर्ण तर, इटलीच्या बार्बरा गेमारोने 4-3.4 गुणांसह रजत पदक मिळवले. संजिव राजपूत, चेन सिंग व एैश्वर्य प्रतापसिंग तोमर यांनी पुरुषांच्या 3 पी गटात रजत पदकावर समाधान मानले.
1️⃣0️⃣th Medal for 🇮🇳
Our champ @anjum_moudgil has won 🥉 in the Women’s 50m Rifle 3 Postions at the @ISSF_Shooting 2022 World Cup, Changwon
Many congratulations👏💯 pic.twitter.com/SlMHntWukN
— SAI Media (@Media_SAI) July 17, 2022
या गटात चेक प्रजासत्ताकच्या संघाने सुवर्णपदक पटकावले. रविवारी मिळवलेल्या या दोन पदकांसह भारताने या स्पर्धेत 11 पदकांसह अव्वल स्थान मिळवले आहे. त्यात 4 सुवर्ण, 5 रजत व 2 ब्रॉंझपदकांचा समावेश आहे.