मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या ठाण्यातील ‘उत्तर सभे’ची उत्सुकता सर्वांना होती. त्यानुसार राज ठाकरे यांनी आज सभा घेतली. या सभेत त्यांनी चौफेर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना लक्ष्य केलं. यात त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. त्याला जयंत पाटील यांनी लगेच प्रत्युत्तर दिलं.
जयंत पाटील म्हणाले की, राज ठाकरेंनी 2014ला मोदींना पाठींबा, 2019 ला मोदींना विरोध आता पुन्हा मोदींची पालखी खांद्यावर घेतली. वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा, मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची, पुतण्या मा. बाळासाहेब ठाकरेंचा. मात्र नातं बाळासाहेबांचा विचार संपवणाऱ्या लोकांशी. वारंवार रंगरूप बदलणारे व्हायरस महाराष्ट्रात वाढत आहेत.
राज ठाकरे यांनी जयंत पाटलांवर जोरदार टीका केली होती. जयंत राव हा विझलेला पक्ष नाही. समोरच्यांना विझवत जाणारा पक्ष आहे. हे काय मला सांगणार यांच्या आमदारांचं काय झालं. राष्ट्रवादीचे आमदार एक मोळी असून त्याला पवारांना बांधून ठेवलं, असंही राज ठाकरे म्हणाले.