Tejashree Walavalkar : झी मराठी वाहिनीवरील ‘उंच माझा झोका’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. या मालिकेत रमाबाई रानडे यांच्या बालपणीची भूमिका तेजश्री वालावलकर (Tejashree Walavalkar) हिने साकारली होती. तिच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते. या मालिकेमुळे तेजश्री घराघरात पोहचली होती. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी आजही ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. नुकतेच तेजश्रीने एक व्हिडिओ शेअर जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
तेजश्रीने बालपणातील साकारलेल्या रमाबाई रानडे यांच्या भूमिकेतील पुन्हा एकदा पेहराव केला आहे. याचा एक व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “अकरा वर्षांनी पुन्हा एकदा नऊवारी नेसून तयार झाले. तयार झाल्यावर माझ्यासोबत लोकेशनवर असलेल्या प्रत्येकाच्या ओठात उंच माझा झोकाच गाण आलं आणि ते गुणगुणायला लागले….जणू एकदम 11 वर्ष मागे गेल्या सारखं वाटायला लागलं….आणि सर्वांच्या मनात असलेल उंच माझा झोकाच अढळ स्थान आणि प्रेम हे 11 वर्षांनी कदाचित तेवढ्याच किंवा त्या पेक्षाही जास्त पटीने वाढलंय अस जाणवलं. माझ्या सोबत असलेल्यांनी लगेच दोन्ही व्हिडिओ एकत्र करून हा सुंदर प्रवास टिपला.”
View this post on Instagram
तेजश्रीने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या अनेकांच्या पसंतीस पडत असून यावर लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. तेजश्रीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने मालिकांष बालनाट्य, बालचित्रपट, लघुपटांमध्ये देखील काम केले आहे. तसेच तिने आजी आणि नात, चिंतामणी या चित्रपटांमध्येही उत्तम भूमिका साकारल्या आहेत.