मुंबई – अजय देवगणच्या ‘थँक गॉड’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ट्रेलरपूर्वी अजय देवगणने चित्रगुप्ताचा डॅशिंग लूक उघड केला होता. हे पाहून लोकही खूप प्रभावित झाले. परंतु अनेकांनी आता सोशल मीडियावर अजय देवगण विरोधात नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे.
‘थँक गॉड’ हा एक कॉमेडी चित्रपट आहे ज्यात चित्रगुप्ता सिद्धार्थ मल्होत्राच्या कर्तृत्वाचा हिशेब मांडणार आहे. अजय देवगण पडद्यावर चित्रगुप्ताच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्विस्ट म्हणजे चित्रगुप्त धोती कुर्ता नव्हे तर कोट-पँट घालून कॅलक्युलेशन करणार आहे. अशात बॉलिवूडमध्ये बॉयकॉटचा ट्रेंड सुरू असताना अजय देवगणचा ‘थँक गॉड’ कसा मागे राहील.सोशल मीडियावर ‘थँक गॉड’वर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे.
क्या बॉलीवुड के लिए हिंदू देवता मज़ाक, अश्लीलता के लिए हैं?
Thank God में अजय देवगन भगवान चित्रगुप्त बने हैं, जिनके पीछे कम कपड़े पहने लड़कियां हैं, वह वासना, घटिया जोक्स पर चर्चा कर रहे हैं।
क्या हिंदू देव मसखरे होते हैं?#BoycottbollywoodCompletely pic.twitter.com/RsTSSP6OEO— सुधीर श्रीवास्तव (सोनू) (@sudhirshiv567) September 9, 2022
अनेक नेटकऱ्यांना असे वाटते की चित्रगुप्त आणि हिंदू देवतांचे आधुनिकीकरण करून चित्रपटात थट्टा केली जात आहे.म्हणूनच अनेकांनी चिडून सोशल मीडियावर अजय देवगण विरोधात नाराजीचा स्वर प्रकट केला आहे. एक यूजर थँक गॉडवर इतका संतापला आहे की तो म्हणतो, ‘बॉलिवुडसाठी हिंदू देव विनोद, अश्लील गोष्टींसाठी आहेत का? थँक गॉडमध्ये अजय देवगण भगवान चित्रगुप्त बनला आहे, ज्याच्या मागे मुली कमी कपडे घालतात. तो वासना, कुत्सित विनोदांवर चर्चा करतो. हिंदू देव विदूषक आहेत का?’ असा सवाल त्या युजरने विचारला आहे.
Humble Request 🙏🏻🙏🏻
हिन्दू के नाम और हिन्दू भगवान के नाम पर अश्लीलता ,नग्नता , मज़ाक और उनके बारे में गलत तथ्य दिखाना बंद करे #Bollywood #ott #southdirtyfilms
— OmKara (@Sanatani_29) September 10, 2022
एकूणच आता नेटकऱ्यानी अजय देवगणवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. हा चित्रपट दिवाळीच्या खास मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. इंद्र कुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. मात्र नेटकऱ्यांनी दर्शवलेल्या विरोधामुळे या चित्रपटाला फटका देखील बसू शकतो अशी भीती निर्मात्यांना वाटू लागली आहे.