लेविन: तुर्की आणि सीरियाला नुकतेच भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. त्यामुळे इथले जनजीवन पूर्णपणे उद्धवस्त झाले आहे. दरम्यान, तुर्की आणि सीरियानांतर आता न्यूझीलंडला देखील भूकंपाचे बसले आहे. न्यूझीलंडला ६.१ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप आला. यूरोपियन-मेडिटेरेनियन सीस्मोलॉजिकल सेंटरने दिलेल्या माहितीनुसार लोअर हटपासून ७८ किलोमीटर वायव्येला भूकंपाचे हादरे बसले.
न्यूझीलंडमधील स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ७.३८ वाजता भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाचं केंद्र पारापारामूपासून ५० किलोमीटर वायव्येला आणि ७६ किलोमीटर खोल होते. वेलिंग्टनच्या दोन्ही बेटांवर भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची सुरुवात एका जोरदार हादऱ्याने झाली आणि त्यानंतर सलग ३० सेकंदांपर्यंत भूकंपाचे छोटे धक्के बसत होते.
#Earthquake confirmed by seismic data.⚠Preliminary info: M6.1 || 78 km NW of Lower Hutt (New Zealand) || 5 min ago (local time 19:38:07). Follow the thread for the updates👇 pic.twitter.com/QLRK4EGfmz
— EMSC (@LastQuake) February 15, 2023
यूरोपियन-मेडिटेरेनियन सीस्मोलॉजिकल सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, वेलिंगटनच्या जवळ लोअर हटपासून ७८ किमी वायव्येला भूकंपाचे हादरे बसले. स्थानिक सरकारच्या भूकंपीय मॉनिटर जियोनेटद्वारे मिळालेल्या माहितीनुसार भूकंपाचे धक्के ४८ किमी खोल होते.जियोनेटने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचे धक्के संपूर्ण देशभरात जाणवले. या भूकंपामुळे किती नुकसान झालं आहे याबाबतची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
न्यूझीलंडला मोठ्या चक्रीवादळाने काल रात्रीपासून झोडपले आहे. देश यामधून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच भूकंपाचे मोठं संकट देशावर उद्भवले आहे. गॅब्रियल चक्रीवादळाने न्यूझीलंडमध्ये मोठी वित्तहानी झाली आहे. यामध्ये आतापर्यंत चार जणांचा जीव दगावला आहे, तसेच १०,५०० लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.