मुंबई – फिलिपाइन्समधून नुकताच भारतात हद्दपार करण्यात आलेला गुंड सुरेश पुजारी याच्या विरोधात एक कोटी रूपयांच्या खंडणी प्रकरणाचा नवीन गुन्हा मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रॅंचने नोंदवला आहे.
एका कर्ज वसुली कंपनीच्या अधिकाऱ्याला धमकावून त्याने त्याच्याकडून एक कोटी रूपयांच्या रकमेची मागणी केली व ती रक्कम न दिल्यास पुजारीने त्याला ठार मारण्याची धमकी दिली होती. वाकोला पोलिसांनी हा गुन्हा नोंदवून घेतला असून त्यांनी तो क्राइम ब्रॅंचच्या खंडणी विरोधी पथकाकडे सोपवला आहे.
पुजारीला सध्या महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात देण्यात आले असून सध्याही तो तेथेच आहे. तो रवि पुजारीचा जवळचा नातेवाईक आहे. पण 2007 सालापासून तो त्याच्यापासून वेगळा झाला आणि त्याने स्वत:ची गॅंग सुरू केली होती. सुरेश पुजारी याने या आधी छोटा राजन बरोबरही काम केले आहे.