पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं. याच पुण्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिकेने देशभरात नावलौकिक मिळवला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात पुण्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका मृणाल नंदकिशोर गांजाळे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे देशातील 50 शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे त्यात मृणाल या महाराष्ट्रातून एकमेव शिक्षिका आहेत. महाराष्ट्रातून एकमेव असलेल्या शिक्षिका मृणाल या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव महाळुंगे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका आहेत. शाळेत विविध उपक्रम त्या राबवत असतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर त्या भर देत असतात. त्या तसेच 2023-24 च्या शरद पवार इंस्पायर फेलोशिप इन एज्युकेशनच्या फेलोच्या मानकरीही ठरल्या आहेत.