वडूज, (प्रतिनिधी)- उंबर्डे येथे नृसिंह जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहाच्या आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी आळंदीतील बाल कीर्तनकारांनी सादर केलल्या कीर्तनाने उत्सवात रंगत निर्माण केली. खटाव तालुक्यातील ऊंबर्डे येथे नृसिंह जयंती उत्सव मोठया उत्साहात झाला.
या जयंती उत्सवाच्या निमित्ताने पहाटेपासून धार्मिक विधी, पूजाअर्चा, अभिषेक असे कार्यक्रम युवा उद्योजक विकास पवार यांच्या हस्ते करण्यात आले. मंदिराचे पुजारी शशिकांत पुजारी व सुरेश जंगम स्वामी (गुरसाळे) यांनी विधीवत मंत्रोच्चारांनी कार्यक्रम पार पाडले. यावेळी महाप्रसादाचेही वाटप करण्यात आले.
आळंदी देवाची येथील भावभक्ती वारकरी शिक्षण संस्थेचे बाल कीर्तनकार हभप नकुल महाराज कोळी यांचे नृसिंह महाराज यांच्या जन्मावर सुश्राव्य कीर्तन झाले. संस्थेचे संस्थापक नवनाथ महाराज शेळके, अमोल महाराज गवंडी, गायनाचार्य साईराज महाराज सामसे, वैभव महाराज शिरसाट, वैष्णवी महाराज आदिंनी साथ दिली.
यावेळी कराड मर्चंट को- ऑप क्रेडिट सोसायटीचे चेअरमन सुरेशशेठ पवार, मजूर फेडरेशनचे माजी संचालक जयसिंगराव जाधव, सोसायटीचे चेअरमन आनंदराव पवार, ज्येष्ठ कार्यकर्ते तात्याभाऊ पवार, माजी सरपंच संजय पवार, बापूराव पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
तर पोपट पवार, विजय पवार, नितीन पवार, प्रमोद पवार, दादा पवार, निलेश पवार, मंगेश पवार, गणेश पवार, नामदेव पवार, नारायण पवार, युवराज पवार, अशोक जगताप आदींनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमास भाविक, ग्रामस्थ, महिला, आबालवृध्दांची मोठया प्रमाणात गर्दी होती.