School Timing Change : राज्यात सध्या उष्णतेचा प्रचंड तडाखा पाहायला मिळत असून विशेषतः नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांत तापमानाने उच्चांक गाठला आहे. उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (School Timing Change) जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत आदेश जारी करत जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या वेळेत बदल केला आहे. नव्या वेळापत्रकानुसार शाळा आता सकाळी ७:०० ते १०:३० या वेळेतच भरवण्यात येणार आहेत. (School Timing Change) उष्णतेचा वाढता प्रभाव लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला असून विद्यार्थ्यांना दुपारच्या कडक उन्हापासून दूर ठेवण्याचा उद्देश आहे. प्रशासनाने शाळांना या आदेशाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (School Timing Change) दरम्यान, हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार अकोला, अमरावती आणि वर्धा या भागांत देशातील सर्वाधिक तापमान नोंदवले गेले आहे. काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (School Timing Change) प्रशासनाचे आवाहन : दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळा भरपूर पाणी प्या लहान मुलांची विशेष काळजी घ्या शक्यतो थंड आणि सावलीत राहा उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेमुळे पुढील काही दिवसांतही अशाच उपाययोजना लागू राहण्याची शक्यता आहे. हेही वाचा : Pune ZP Schools : ग्रामीण शिक्षणाची नवी झेप! आता झेडपी शाळांमध्ये मिळणार १० वीपर्यंतचे शिक्षण Red Cliff School : रेड क्लिप स्कूलची मनमानी! विद्यार्थ्यांसह पालकांचे पालिकेसमोर आंदोलन; नेमकं प्रकरण काय?